जुना बिडी घरकुल गडगी नगर परिसरातील घरात लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू

सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगर, सुवर्ण कळस जवळ एका राहत्या घरात लागलेल्या भीषण आगीत एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज, १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास घडली
ही घटना सोलापूरच्या जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगर येथे घडली. दुसऱ्या मजल्यावरील एका घरात अचानक आग लागली, ज्यामध्ये ४० वर्षीय पल्लवी प्रवीण सग्गम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली, परंतु पल्लवी सग्गम या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.
सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि पोलिसांनी याबाबत तपासाला सुरुवात केली आहे.



