सोलापूर सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करावे

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पाठवले पत्र

सोलापूर ( प्रतिनीधी):- विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करण्यात यावे. या मागणीचे पुस्तक स्वरूपात पत्र सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती लेखक सुशील फडके आणि रजनीकांत क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन मनातील राष्ट्रपिता या पुस्तकाचे प्रकाशन अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पनातून देशाला बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण

कार्य डॉ. आंबेडकर यांनी केली केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करण्यात यावे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी हे पुस्तकरुपी पत्र त्यांना स्पीड पोस्टाने पाठविण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर तरी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर देशाची वाटचाल सुरू आहे. सामाजिक स्वास्थ्य, राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या नात्याने त्यांच्याकडे ही मागणी केली आहे.

या मागणीला स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने चे जिल्हाध्यक्ष दिनेश काटकर सोलापूर शहर कार्याध्यक्ष विनोद भोसले पाठिंबा दिला आहे, . या पत्रकार परिषदेस सुशील फडके दिनेश काटकर विनोद भोसले उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel