महाराष्ट्र

33 रनवर असताना सुटलेला कॅच नाही तर ‘हा’ ठरला मॅचचा टर्निंग पॉइण्ट; मॅक्सवेलचाच खुलासा

World Cup 2023 Glenn Maxwell Reaction On Turning Point In Match:

 ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक झळकावत अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या. मॅक्सवेलने मिळवून दिलेल्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. 292 धावांचा पाठलाग करताना 91 धावांच्या आत 7 गडी बाद झालेले असताना मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दोघांनी अधिक पडझड न होऊ देता सामना जिंकवून दिला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडचा विजयाचा घास मॅक्सवेलने ओढून घेतला. मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मॅक्सवेलच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला असतानाही त्याने मैदान सोडलं नाही. मॅक्सवेल खेळणार नाही असं वाटत असतानाही तो शेवटपर्यंत मैदानावर उभा होता. सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर सामन्यातील टर्निंग पॉइण्टबद्दल मॅक्सवेलने भाष्य केलं आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel