सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

दुबई–सोलापूर औद्योगिक मैत्रीचे नवे पर्व…

जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज: आमदार सुभाष देशमुख

दुबई आणि सोलापूर यांच्यात औद्योगिक मैत्रीचे नवे नाते सुरू झाले असून, सोलापूर जिल्हा समृद्ध व्हावा यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारवाढीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. सोलापूरच्या गारमेंट उद्योगासह इतर स्थानिक उत्पादनांचे जागतिक स्तरावर मार्केटिंग व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जुळे सोलापूर येथील साईवेद डिव्हाईन, दुसरा मजला, शिवदारे कॉलेजजवळ, विशाल नगर येथे शनिवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी कन्सिस्टंट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स प्रा. लि. या कंपनीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देशमुख होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांची होते.

दुबई (संयुक्त अरब अमिराती) येथे 2007 साली स्थापन झालेली Consistent ही Construction क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची Engineering कन्सल्टन्सी कंपनी आता सोलापूरमध्ये आपले कार्य सुरू करत आहे. बिल्डिंग इंजिनिअरिंग व सस्टेनेबिलिटी क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या या कंपनीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
आखाती देशांमध्ये प्रत्येक वर्षी सर्वोत्कृष्ट २० इंजिनिअरिंग कंपन्यांची सूची प्रसिद्ध केली जाते, त्यामध्ये Consistent Engineering गेली ५ वर्ष सलग त्यांचे स्थान यादीमध्ये उंचावत
आहे. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे Consistent Engineering ही त्या सूचीतील एकमेव भारतीय कंपनी आहे.

दुबईमध्ये व्यवसाय क्षेत्रात मोठे यश मिळवूनही आपल्या मायभूमीत काहीतरी करण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सागर कुलकर्णी यांनी अल्पावधीत सोलापूरमध्ये नवीन कार्यालय सुरू केल्याबद्दल आमदार देशमुख यांनी त्यांचे आभार मानले. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी आपल्या मनोगतात सागर कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, दुबईसारख्या देशात यश मिळवूनही मूळ गावी उद्योग सुरू करण्याचा निर्णय प्रेरणादायी आहे. त्यांच्या सुपुत्र व सुनबाईंनी दुबईहून सोलापूरमध्ये स्थलांतर करून हा व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले.

कंपनीचे प्रमुख सागर कुलकर्णी यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितले की, सोलापूरच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि शहर आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. गुणवत्ता (Quality) व सचोटी यात सातत्य ( Consistent) राखले तर तरुणांना कुणीही यशापासून परावृत्त करू शकत नाही, दुबई येथील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सोलापूरच्या विकासासाठी कसा करता येईल तसेच सोलापूरमधील विविध उत्पादनांचे जागतिक स्तरावर मार्केटिंग कसे करता येईल यासाठी कंपनी कार्यरत राहील.
या कार्यक्रमाला सागर कुलकर्णी, सरिता कुलकर्णी, सलील कुलकर्णी, सृष्टी कुलकर्णी यांच्यासह सोलापूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel