सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

मातोश्री विद्यालय म्हैसगांव येथे वार्षिक पारितोषिक वितरण व इयत्ता 10 वी चा शुभेच्छा समारंभ संपन्न…

म्हैसगांव- सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव येथे वार्षिक पारितोषक वितरण व इयत्ता दहावीच्या वर्गाचा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
सुरुवातीला विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून , संविधानाच्या प्रास्ताविकतेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते. तर प्रमुख पाहुणे आईसाहेब सुशीलादेवी भालशंकर, संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड , राष्ट्रसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय मंजुश्री खंडागळे ,म्हैसगांवचे प्रगतशील बागायतदार अनिल तात्या खारे, महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनोद वर सर यांनी केले.
यावेळी संविधान गौरव परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या तसेच विविध स्पर्धेमध्ये व विविध उपक्रमामध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रांचे वाटप अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले .
यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी संस्कृती वाघमारे व रिया महाजन यांनी उत्कृष्टपणे आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे , संस्थेचे संस्थापक सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन यश संपादन करायचे असते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पांडव मॅडम यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार भारत कापरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिलचंद्र भालशंकर , सहशिक्षक संजय गायकवाड, रमेश बनसोडे ,माधव माने अशोक कांबळे, दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia