सोलापूर (प्रतिनिधि) : – गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्याद्वारे दरवर्षी शालेय आणि विद्यालयीन विद्यार्थ्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी २ ऑक्टोबर २०२३ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर विद्यालयातील १२० विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून याही वर्षी या विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. इयत्ता नववीत शिकणारी कु. रक्षिता राजशेखर पोतदार हीने सोलापूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकविला. तीच्या या यशाबद्दल तिला प्रमाणपत्र आणि रौप्य मेडल प्रदान करण्यात आले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख शेख अब्दुलकादर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक विद्यालयाचे मुख्याध्यापक आझाद काझी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दाल रयत सेवक दत्तासो पवार, सचिन पाटील, संतोष पाटील, भीमाशंकर सोनगे आणि रशीद शेख यांनी केले. विद्यार्थ्यानी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव मा. श्री विठ्ठल शिवणकर, विभागीय चेअरमन श्री संजीव पाटील, सहसचिव मा.श्री.राजेंद्र साळुंखे, विभागीय अधिकारी श्री. सुरेशकुमार गोडसे, स्थानिक स्कूल कमिटीचे श्री बाळप्पा कल्लप्पा नांगरे मामा, उपसरपंच श्री संतोष माशाळे, आजी-माजी विद्यार्थी, कुसूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, विद्यालयाचे मार्गदर्शक श्री सुनील नांगरे यांच्यासह कुसूर-खानापूर पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी आणि पालकांनी केले आहे.