पंजाब तालीम येथील घर जागेच्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील महिला आरोपीचा जामीन फेटाळला :- अँड. रियाज एन. शेख
दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09:30 वाजण्याच्या सुमारास घर जागेच्या वादासंबंधी झालेल्या तक्रारीमध्ये आरोपी नातेवाईकांनी संगणमत करून शहाजहान गुलहमीद शेख यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जीवे ठार मारल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये अटकेत असलेली महिला आरोपी रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांनी फेटाळून लावला.
यात घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की, :-
दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घरजागेच्या वादा संबंधी चर्चा करीत असताना आरोपींनी संगणमत करून शहाजहान गुलहमीद शेख यांना लाकडी दांडक्याने ठिक ठिकाणी मारून जखमी करून त्यांचा खून केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा सलीम शहाजहान शेख, वय- 30 वर्ष, राहणार- पंजाब तालीम, सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने सदर गुन्हातील आरोपी साबीर शेख, समीर शेख, साकिब शेख, सुफियान शेख, रेहाना शेख, मेहरुन शेख अशा आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 व इतर कलमांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हामध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली व त्यांना पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झालेली आहे. सदर घटने मधील महिला आरोपी रेहाना समीर शेख यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर केला होता.
सदर जामीन अर्ज मूळ फिर्यादीतर्फे एडवोकेट रियाज एन शेख यांनी हरकत घेऊन जामीन देण्यास विरोध दर्शविला तसेच सदर जामीन अर्ज फेटाण्याकरिता फिर्यादी यांचे प्रतिज्ञापत्र सादर करून युक्तिवाद करत असताना सदरचा खटला हा अत्यंत गंभीर असून किरकोळ कारणावरून खून करण्यात आलेला आहे. आरोपी जरी महिला असली तरी तिचा गुन्ह्यामध्ये सकृत दर्शनी सहभाग आहे. महिला आरोपीने स्वतःच्या लहान मुलांचा कोणताही विचार न करता सदर गुन्ह्यामध्ये सहभाग घेऊन खून केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास अद्याप प्राथमिक स्तरावर असून अद्याप दोषारोप पत्र दाखल झालेले नाही. जर महिला असल्याची सहानुभूती दिली तर इतर आरोपींना त्याचा फायदा होईल म्हणून सदर आरोपी रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज फेटाण्याची विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांनी आरोपी महिला रेहाना समीर शेख हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
सदर प्रकरणांमध्ये मूळ फिर्यादीतर्फे अँड. रियाज एन. शेख एन तर सरकार पक्षा तर्फे दत्ता पवार यांनी काम पाहिले तसेच महिला आरोपी तर्फे लोक अभिरेक्षक शिवकुमार झुरळे यांनी काम पाहिले.