पत्नीला जाचहाट व पैशाची मागणी या खटल्यामध्ये शोएब महागामी वगैरे ४ यांची निर्दोष मुक्तता
यात थोडक्यात हकीकत अशी की, यात फिर्यादी सना शोएब महागामी, वय ३२ वर्षे, धंदा घरकाम, सध्या रा. बैतुल फैज अर्पाटमेंट, लष्कर, सोलापूर यांनी समक्ष हजर राहून दिनांक २८/०९/२०१६ रोजी जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ४९२/२०१६ आयपीसी कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे फिर्याद दिली होती की, फिर्यादीचे लग्न शोएब महागामी यांच्या बरोबर दिनांक ०३/०१/२०१६ रोजी समाजाचे रितीरिवाजाप्रमाणे अचिव्र्व्हस हॉल नं. १ येथे लग्न झाले. त्यावेळेस महेरची रक्कम म्हणून रुपये २१ हजार ठरविण्यात आली व दोन्ही बाजूचे लग्नाचा खर्च फिर्यादीचे वडीलांनी केला. त्यावेळी २५ ग्रॅच सोने, कपडयासाठी २५ हजार रोख रक्कम व दहेजचे कसामान व संसारउपयोगी सामान, फिर्यादीचे अंगास १ सोन्याचे राणीहार, सोन्याचा छोटा हार, दोन नग सोन्याचे बांगडया, तीन सोन्याचे अंगठया व जोडे सोन्याचे टॉप्स असे एकूण १० तोळे सोन्याचे दागिने घालून एकूण अंदाजे ६ ते ७ लाख रुपये खर्च करुन दिले.
लग्नानंतर फिर्यादी ही सासरी नांदत असतांना आरोपी शोएब महागामी हे पहाटे ३ वाजता घरी येत होते. फिर्यादीने आरोपीस एवढा उशीर घरी का येता असे विचारणा केली असता त्यांनी तू मला पसंद नाहीस, तू मनोरुग्ण आहे म्हणून मला अपनामानास्पद वागणूक देऊन टोचून बोलून मानसिक त्रास देऊ लागले. त्यावेळी फिर्यादीचे सासू, सासरे यांना पती बाबत सांगतले की, शोएबमहागामीने आई वडीलांना का सांगीतले म्हणून शिवीगाळ करुन हाताने व लाथा बुक्याने मारहाण केली. त्यावेळी सासू, सासरे हे सोडण्यास देखील आले नाही म्हणून फिर्यादी ही माहेरी निघून गेली. थोडे दिवस गेल्यानंतर फिर्यादीचे पती शोएब महागामी याने पानगल हायस्कूल समोर फ्लॅट घ्यायचे आहे म्हणून तुझे आई वडीलांकडून २० लाख रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला व शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबाबतची फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दिले होते. त्यावर जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीसांनी सदर गुन्हयाचा तपास करुन शोएब महागामी व इतर ४ यांचे विरुध्द दोषारोपपत्र मे. कोर्टात दाखला केला.
सदरचा खटला मा. चिफ ज्युडिशिएल मॅजिस्ट्रेट श्री. भंडारी साहेब यांच्याकडे सुनावणी झाली. यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रमुख साक्षीदार फिर्यादी सना शोएब महागामी स्वतः, फिर्यादीची आई रुक्साना पिरजादे, फिर्यादीचा भाऊ अजहर पिरजादे, सहाय्यक फौजदार अ. हमीद चांद शेख व तपासी अंमलदार सहाय्यक फौजदारी सुहास रत्नाकर आखाडे यांची साक्ष घेण्यात आली. आरोपीच्या वतीने अॅड. जहीर सगरी यांनी सर्व साक्षीदारांचे जबाबामध्ये विसंगत व विराधाभास मे. कोर्टासमोर उलट तपासामध्ये घेण्यात आली. यात अंतिम युक्तीवाद करतांना अॅड. जहीर सगरी यांनी युक्तीवाद केला की, वरील गुन्हयामध्ये आरोपींना गुंतविण्यात आले आहे, फिर्यादीने स्वतः कबुल केले आहे की, त्याने आरोपीचे घरी दिड महिने राहिले व त्यामध्ये एक महिना माहेरी राहिले, आरोपीच्या घरी फक्त १५ दिवस नांदले, व उलट तपासामध्ये असे त्यांनी जबाब दिला की, बाकीचे आरोपीची आई आरोपी नं. २ हे घरात नसायचे ते जि.प. विभागामध्ये शिक्षक पदावर काम करीत असल्याने ते संध्याकाळी यायचे व तसेच सासरे आरोपी नं. ३ देखील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते देखील संध्याकाळी जाऊन सायंकाळी यायचे व तसेच दिर आरोपी नं. ४ रमीज महागामी हे नोकरी निमित्ताने पुणे येथे राहण्यास आहे त्यामुळे घरी फिर्यादीचे व्यतिरिक्त कोणीच नसायचे. सदरची बाब ही मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली व तसेच २० लाख चीमागणी केली आहे ते एसबीआय बँकेकडून गृहकर्ज घेऊन घेतल्याने त्यामुळे २० लाख ची मागणी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही व तसेच फिर्यादी ही नेहमी आजारी असते. आजार लपविण्याकरीता सदरचा खोटा गुन्हा दाखल केला आहे असा युक्तीवाद केला.
सदर युक्तीवाद ग्राहय धरुन मे. चिफ ज्युडिशिएल मॅजिस्ट्रेट श्री. भंडारी साहेब यांनी आरोपी नं. १ शोएब महागामी, आरोपी नं. २ रुबीना महागामी, आरोपी नं. ३ अनिसुर्रहमान महागामी व आरोपी नं. ४ रमीज महागामी यांच्यावर गुन्हा सिध्द झाला नाही, गुन्हा शाबीत झाला नसल्याने सर्व आरोपींची
निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीच्या वतीने अॅड. जहीर बी. सगरी यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. अमर डोके यांनी काम पाहिले. व मूळ फिर्यादी सना महागामी अॅड. फेरोज शेख यांनी काम पाहिले.