महाराष्ट्रक्राईम

18 वर्षाखालील मुलांच्या हाती दिले वाहन ; 7 पालकांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पुण्यातील पोर्श कार अपघाताची संपूर्ण देशभरात गाजलेली असतानाच आता ठीक ठिकाणी लहान मुलांच्या म्हणजेच अठरा वर्षाच्या आतील मुलांना बेजबाबदारपणे वाहन देणाऱ्या पालकांवर सुद्धा महाराष्ट्रातील तमाम शहर आणि जिल्ह्यामध्ये कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला आहे…

अल्पवयीन चालकांना वाहन चालविताना रंगेहात पकडले. यात तब्बल सात अल्पवयीनांच्या पालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या पथकाला भंडारा शहर परिसरात अल्पवयीन बालके वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धडक मोहीम व कारवाई करण्यात आली.

यात दुचाकी क्रमांक एम एच ३६ जे ९९८३, एमएच १२ पीएफ ८०६९, एमएच ३६ ऐई ०१०९, एमएच ३६ एएन ३६२८,एमएच ३६ पी ०९६५, एमएच ३६ एजे ७४७१ व एमएच ४९ बीएल ६०५२ चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादंविच्या १८४, १९९ (अ) (१)

मोटर वाहन कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश गोस्वामी, भूषण कोळी, अंमलदार सुधीर मडामे, राम हटवार, हरीशकुमार बुंदिले, देवेंद्रखडसे, स्वप्निल गुल्हाने, रमेश चोपकर, अतुल गायधनी, मनोज भुते, दिलीप तरारे, संदीप सेलोकर, सचिन जंजाळ, नीतेश चिलमकर, सागर मोहतुरे, किशोर मते, सोनल गेडाम यांनी केली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.