क्राईम

एकाच कुटूंबातील 4 वर्षीय चिमुकलीसह तिघांची आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगरातील वळदगावमध्ये एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती – पत्नी आणि चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. मोहन प्रताप डांगर ( 28 ) , पुजा मोहन डांगर ( 24 ) आणि श्रेया ( 4 ) अशी मृतांची नावे आहेत.

सातारा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वळदगावमध्ये उपसरपंच संजय झळके यांच्या घरी डांगर कुटुंब भाड्याने राहत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री या दामपत्त्यामध्ये भांडण झाले. शनंतर यांनी प्रथम मुलीला गळफास देऊननंतर पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज सकाळी घटना उघडकीस आली असून सातारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांनी सांगितले की या घटनेची माहिती डांगर यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून ते आल्यानंतरच नेमका काय वाद होता हे समोर येईल. तर घरगुती वादातून हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

508 Insufficient Resource

The website is temporarily unable to service your request as it exceeded resouce limit. Please try again later.