पाकिस्तानात राहून २०,००० भारतीय सैनिकांचे प्राण वाचवणाऱ्या खऱ्याखुऱ्या ‘टायगर’ची कहाणी ठाऊक आहे का?

सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. नुकतंच ‘टायगर ३’ने एक नवा रेकॉर्ड रचल्याचं स्पष्ट झालं आहे. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘टायगर ३’ हा दिवाळीच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ९४ कोटींची कमाई केली आहे.
सध्या या चित्रपटाची प्रचंड हवा आहे, पण ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे की या चित्रपटातील अन् या स्पाय युनिव्हर्समधील ‘टायगर’ हे पात्र एका खऱ्या रॉ एजेंटवरुन प्रेरित आहे. अर्थात याचा दावा कोणत्याही चित्रपटात दिग्दर्शक किंवा लेखकाने केलेला नाही. सलमान खानचे ‘टायगर’ हे पात्र काल्पनिकच असल्याचं सगळीकडे नमूद करण्यात आलं आहे. शिवाय चित्रपटातील पात्र अन् खरा गुप्तहेर यांच्यातही बरीच तफावत आपल्याला आढळून येईन, पण तरी एक असा भारतीय गुप्तहेर होता ज्याचं टोपणनाव ‘टायगर’च होतं. आज त्याच्याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.



