महाराष्ट्र

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात येणारे बनावट चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनविणाऱ्यास अटक

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना “चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र” हे संबंधीत पोलीस ठाणे व
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील जिल्हा विशेष शाखेकडून देण्यात येते. सदरचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र पोलीसांच्याpcs.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते. सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे
पारदर्शी, कमी खर्चाची व विलंब टाळणारी आहे.
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडे पाकणी ता.उ. सोलापूर येथील एक इसम बनावट
चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत असल्याची माहिती प्राप्त होती. बनावट प्रमाणपत्र देण्याऱ्या इसमांचा शोध
घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना दिल्या होत्या. त्यावरून पोनि सुरेश निंबाळकर, स्था.गु.शा.सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शैलेश खेडकर यांनी सदर बातमीची
पडताळणी केली असता पाकणी येथील एक इसम पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या चारीत्र्य
पडताळणी प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून व त्यावरील डिजीटल सिग्नेचरच्या चिन्हाचा फसवणूकीकरीता गैरवापर
करून बनावट प्रमाणपत्र देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदर इसमाविरूध्द पोहेकॉ चंद्रकांत बाबूराव पवार
यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.क.४२०, ४६४,४६५,४६८,४७१ माहिती
तंत्रज्ञान अधिनिमय २००५ चे कलम ६६ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर इसमास अटक
केलेली असून त्याची दिनांक २५.०९.२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे.
याद्वारे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
देण्यासाठी शासनाकडून विलंब टाळणारी व कमी खर्चात प्रमाणपत्र देणारी ऑनलाईन कार्यपध्दती अवलंबविण्यात
येत असून नागरिकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. बनावट कागदपत्रे तयार करणे, ते बाळगणे आणि
बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे हा गंभीर दखलपात्र अपराध आहे. अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र देण्याचे
कोणी अमिष दाखवत असेल अथवा प्रमाणपत्र देणाऱ्यांबाबत माहिती असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाशी
तात्काळ संपर्क साधावा.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel