सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

प्रभाग २२ मध्ये भाजपाचा दमदार शक्तीप्रदर्शन: किसन जाधव संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…

प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी आपली सहकार्याची भूमिका-पालकमंत्री जयकुमार गोरे

प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं ढोल ताशाच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजी करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे अवघा परिसर भाजपमय झाला होता. तर जय श्रीराम जय जय श्रीराम चा नारा घूमल्याने अवघा परिसर भगवामय झाला होता. प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव व नागेश आण्णा गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून भरीव कामे केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभाग २२ मधील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळातही विकासकामांसाठी संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार देवेंद्र कोठे यांनी किसन जाधव यांचे कार्य लोकाभिमुख व प्रभावी नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगत, सोलापूर शहर मध्य विधानसभेत ‘इच्छा भगवंताची’ परिवाराने बजावलेल्या किंगमेकर भूमिकेचा विशेष उल्लेख केला. लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व घडल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी नगरसेवक किसन भाऊ जाधव, माजी नगरसेवक नागेश आण्णा गायकवाड, नगरसेविका चैताली शिवराज गायकवाड, दत्तात्रय मामा नडगिरी, प्रभाग क्रमांक २३ चे नगरसेवक राजशेखर मल्लिकार्जुन पाटील, प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेविका कल्पना संतोष कदम, अंबादास जाधव, अमोल गायकवाड, विनोद भाऊजी गायकवाड, अँड. किरण गायकवाड, चेतन नागेश अण्णा गायकवाड, उमेश जाधव, शरद शिंदे, निलेश कांबळे,संतोष गायकवाड, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, माऊली जरग, शहाजन शेख, शिवा पाटणकर, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, प्रथमेश पवार, माणिक कांबळे, फिरोज पठाण, वसंत कांबळे, महादेव राठोड, हूलगप्पा शासम, अजिंक्य शिंदे, सचिन राऊत, ऋषी येवले, दिनेश आवटी, नागेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात किसन जाधव यांनी पालकमंत्री गोरे व आमदार कोठे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद व सहकार्य अपेक्षित असल्याचे मनोगत व्यक्त केले. दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर श्रीकांचनाताई यन्नम आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी सौ मोनिका वहिनीसाहेब यांनी देखील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel