सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक
बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. . प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
याप्रसंगी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंड, जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा खजिनदार दाऊत आतार, नागेश सातपुते, गाडे सर, निर्मला मौळे,आम्रपाली भालशंकर , गायकवाड सर, सिद्धेश्वर भुरले, दिलीप गायकवाड, दत्तात्रय शिंदे, प्रा. अभिजीत भंडारे, इन्नुस बाळगी, महिबूब तांबोळी, रत्नदीप कांबळे, नागेश सातपुते, एकोराम चौगुले, शिवानंद चौगुले आदी उपस्थित होते.