सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान…

दि. महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नामदेवराव(बापू) बंडूजी भालशंकर यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रिया कदम, निर्मला मौळे, कविता कदम, पृथ्वी शिंदे, डॉ. श्रुतिका उडाणशिव, फरीदा बेलीफ, अजिमुलिस्सा सुभेदार, महानंदा शिंदे यांच्यासह इतर महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच समारंभात दाऊत आतार यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड तसेच नीलकंठ अय्यर यांच्या वाढदिवसानिमित्त व कल्पना टेकाळे यांची सरपंचपदी निवड झाल्या निमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष विठ्ठल एकमल्ली, सिद्धेश्वर भुरले, आगतराव बनसोडे, रोहित गायकवाड, विठ्ठल मोरे, अभिजीत भंडारे, सुनील स्वामी, नागेश सातपुते, सचिन राजगुरू, नागनाथ गायकवाड, इरफान शेख, संदीप निस्ताने, इन्नुस बाळगी, एस. पी. काळे, व्हनमाने ए.ओ., जी. एस. कुत्रणे, ए. एच. व्हनमाने, जी. एस. कुंभार, एम. एम. कुंभार, दादा कांबळे, श्रीकांत टेकाळे, शिवानंद चौगुले, जय पाटील, कृष्णदेव हेंबाडे, राजेंद्र सोरटे, यशपाल आकाडे, परमेश्वर उघडे, संजय केकान, एकोराम चौगुले, जी.डी.पाटील, महिबूब तांबोळी यांच्यासह संघटनेतील इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. या समारंभाचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांनी केले तर डॉ. राजदत्त रासोलगीकर यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel