सोलापूर क्राईम

ब्रेकिंग…शौकत पठाण यांचेवर गुन्हा दाखल…

सोलापूर शहरात आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल

सोलापूर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगचे दोन गुन्हे दाखल आहेत.दोन्ही गुन्हे सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.पहिल्या गुन्ह्यात अल्ताफ अ.लतीफ शेख(वय 45 वर्षे,रा सोलापूर) यावर गुन्हा दाखल झाला आहे.अल्ताफ शेख हा सरळ बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मतदान केंद्रावर थांबून तोतया अधिकारी बनून फिरत होता.पोलिसांनी त्याला हटकले असता,त्याने प्रासायिडिंग ऑफिसर आहे अशी भुलताप मारत मतदान केंद्रात फिरत होता.मतदान केंद्रा वर सदर बाजार पोलिसांचा बंदोबस्त होता.पोलिसांनी कसून चौकशी करत,पडताळणी केली असता अल्ताफला कसल्याही प्रकारची इलेक्शनची ड्युटी नव्हती,त्यामुळे पोलिसांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.

शौकत पठाण,रियाज सय्यद,ओंकार सुनील गायधनकर,संध्या सुनील नागरेअनुप्रिया रमाकांत जाधव,मनीषा उदानशिव यांच्या विरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाला आहे.मतदान केंद्रा जवळ विना परवाना मंडप मारून स्लिप वाटप करण्याचे काम केले अशी फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात बाळू जाधव यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel