भिडे गुरुजीना चावलेल्या कुत्र्याला संरक्षण द्या;संघर्ष सेनेची मागणी…

ऐतिहासिक असा भटका कुत्रा त्याच आम्ही वाजतगाजत सोलापुरात स्वागत करणार.
सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा सन्मान.
सोलापूर:सोलापूर शहरात संघर्ष सेनेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचा सन्मान करण्यात आला.संघर्ष सेनेचे पदाधिकारी शेखर बंगाळे यांनी मोकाट कुत्र्याना दुध चपाती खाऊ घालत ,गुलाबाचं हार घालून सन्मान केला.भिडे गुरुजींना चावलेल्या कुत्र्याला संरक्षण द्या,तो ऐतिहासिक असा कुत्रा आहे.कुत्रा हा नेहमी प्रामाणिकपणे काम करणारा कुत्रा आहे.भटका असो किंवा पाळीव असो,त्यामध्ये प्रामाणिकपणा असतोच.त्या ऐतिहासिक कुत्र्याला अगर सोलापुरात आणले तर त्याचा आम्ही वाजतगाजत स्वागत करणार असं शेखर बंगाळे यांनी प्रतिक्रिया दिली.
*भीमा कोरेगाव प्रकरणामुळे कुत्र्याने चावा घेतला असेल- सोलापूर मधील संघर्ष सेनेचे पदाधिकारी शेखर बंगाळे यांनी माध्यमांना माहिती देताना,भीमा कोरेगावचा उल्लेख केला.भीमाकोरेगाव दंगलीत मनोहर भिडे यांचे नाव आले होते,त्यामुळे सांगलीतल्या त्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला असेल असंशेखर बंगाळे यांनी म्हटलं.
*सोलापूर मधील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सन्मान-
शेखर बंगाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमधील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांना दूधचपाती खाऊ घालत ,त्यांना पोटभर अन्नदान केले.गुलाबांचं हार भटक्या कुत्र्याना घालून त्यांचा सन्मान केला.भिडे गुरुजींना चावा घेणाऱ्या त्या भटक्या कुत्र्याला संरक्षण द्यावे अशी मागणी केली.माणसांत प्रामाणिकपणा राहिला नाही,कुत्र्यांत मात्र खूप प्रामाणिकपणा आहे असं देखील बंगाळे यांनी टोमणा मारला.