सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो- आमदार देवेंद्र कोठे

महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरा...

एमआयडीसी परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा विद्या मंदिर व सोमनाग प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या जल्लोषात साजरा झाला. दरम्यान या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकर चौगुले, संस्था सचिव सौ शारदा चौगुले, एमआयडीसी पोलीस चौकीचे जाधव, संस्था संचालक सौरभ चौगुले, अमर चौगुले, नागराज चौगुले, महात्मा विद्या मंदिरचे मुख्याध्यापिका सौ सविता गायकवाड, सोमनाग प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी निळ, थोबडे प्रशालाचे मुख्याध्यापक चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिरचे चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक चौगुले सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार देवेंद्र कोठे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले. यावेळी प्रास्तावकात संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले म्हणाले की विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात पुस्तके अभ्यासाबरोबर सोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाने केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो या माध्यमातून त्यांच्या कला गुणांचा गौरव होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यवसायिक शैक्षणिक क्षेत्रात ही त्याचा चांगला उपयोग होतो. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला चांगले छंद झोपावेत असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गीत गायन, पारंपारिक नृत्य, तेलुगु नृत्य, गवळण, कोळी गीते, पोवाडा, आदिवासी नृत्य,देशभक्तीपर गीते, सामूहिक व वैयक्तिक नृत्य, विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. मोठ्या जल्लोषात महात्मा विद्यामंदिर व सोमनाथ प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा झाला. या स्नेहसंमेलनात बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन दहावीचे विद्यार्थी आणि खैराट मॅडम यांनी केले तर आभार नायककोंडी यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या वार्षिक स्नेहसंमेलनास बहुसंख्य पालक वर्गांनी उपस्थिती लावली होती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel