सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 56 सफाई कामगार महिलांचा साडी देऊन सन्मान…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक मनीष केत यांच्यामार्फत महापालिकेतील सफाई कामगार महिला भगिनींना साडी वाटपाचा कार्यक्रम सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते, आमदार देवेंद्र कोठे, यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रा.उत्तरा बर्डे बचुटे , भारतीय जनता पक्षाचे शहरचिटणीस आदर्श सरतापे , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले यांसह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगरसेवक मनीष केत यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं.त्यानंतर कार्यक्रम आयोजना मागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी स्पष्ट केला. यावेळी सोलापूर शहराच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या या महिला भगिनी खऱ्या अर्थानं स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्यामुळे, सोलापूरचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे असं ते म्हणाले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सफाई कामगार महिला भगिनींना फेटा बांधून आणि साडी देऊन त्यांचा सन्मान कार्यक्रमात करण्यात आला.यावेळी 56 सफाई कामगार महिलांना सासाड्यांचे वाटतो करण्यात आले .

कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेला हा उपक्रम सर्व सफाई कामगार महिला भगिनींना शाबासकी देणारा असून भविष्यात महाराष्ट्रातली स्वच्छ महानगरपालिका म्हणून सोलापूर शहराची ओळख या महिला भगिनी आपल्या कामातून करून देतील अस मनोगत बापू सदाफुले यांनी व्यक्त केल.

त्यानंतर आपल्या कामातून खऱ्या अर्थान लोकसेवा करण्याचं काम या महिला भगिनी करत असून 56 व्या वाढदिवसानिमित्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या

सोलापूर हे उत्सवांचे शहर असून स्वच्छतादूत म्हणून कार्यरत असलेल्या महिला भगिनी यांचे हात अविरत काम करत असतात, ही गोष्ट खरंच कौतुकास्पद असल्याच्या भावना सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जयपाल खेडकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा आणि अल्पोपहार देण्यात आला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login