सोलापूर महानगरपालिकाआरोग्यमहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमीसोलापूर राजकीय

सोलापुरातील “त्या” हॉस्पिटलमध्ये ‘जनरल सोनोग्राफी’ कधी सुरू होणार?

नागरिकांच्या सुविधेसाठी नगरसेवक सीए. विनोद भोसले यांची ठाम मागणी...

सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर (लेडी डफरीन) हॉस्पिटलमध्ये तातडीने जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले आणि भाजपा मंडल अध्यक्ष नागेश खरात यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे व आरोग्य अधिकाऱ्यांकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या या रुग्णालयात केवळ गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध असून इतर आजारांच्या निदानासाठी येणाऱ्या हजारो रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयातच जनरल सोनोग्राफी सेवा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांना कमी खर्चात, वेळेत आणि विश्वासार्ह तपासणीची सुविधा मिळेल. यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि आधुनिक उपकरणांची तातडीने उपलब्धता करून सेवा नियमितपणे सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

या मागणीवर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करून जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती भोसले यांनी दिली.

शहरातील वाढती आरोग्यसेवेची गरज लक्षात घेता महापालिकेने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

निवेदनावेळी शाहू महाराज सलगर, श्रीकांत गायकवाड, दिनेश जाधव, चंद्रकांत पात्रे, सौरभ साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.