सोलापूर क्राईम

मैं वकील हूँ, पोलीस क्या करती है, मैं देख लूंगा ; शुकुर कुरेशी कुटुंबांवर गुन्हा दाखल

कतलीसाठी आणलेले गाई ही केले जप्त...

सोलापूर : पोलीस परवानगीशिवाय जनावरे घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रयत्न करणाऱ्या कुरेशी कंपनीवर पोलीसांनी आज कडक कारवाई करत त्यांचेवर कलम 353 खाली गुन्हा दाखल केला. त्यांना पोलीस समजावून सांगत असताना, पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आलीय. हा प्रकार जेलरोड पोलीस ठाणे परिसरात सकाळी ११.३० ते १२ वा दरम्यान घडलाय. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुरेशी कुटुंबातील चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बादशाह पेठ येथेतेलंगी पाच्छा पेठेतील रहिवासी अब्दुल शुकूर कुरेशी यांनी ‘ तुम ये जानवर यहाँसे लेके जावो, मैं वकील हूँ, पोलीस क्या करती है, मैं देख लूंगा’ अशी चिथावणी यांनी दिल्यावर त्यातून ही घटना घडलीय. शनिवारी सकाळी बेगम पेठेतील कुरेशी गल्लीतील माशाअल्लाह मटन दुकानाजवळ सद्दाम शुकूर कुरेशी याच्या मालकीची १ गाय व २ वासरे निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ती जित्राबं ताब्यात घेऊन जेलरोड परिसरात आणली होती.

ती जनावरे परस्पर पुर्व परवानगी न घेता, ते जबरदस्तीने ताब्यात घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करुन, शासकीय कर्तव्य करीत असताना, फिर्यादीस व पोनि बिराजदार, पोसई जाधव, पोकॉ चव्हाण, पोहेकॉ उघाडे यांना वरील आरोपीतांनी आपसात संगणमत करुन, शासकीय कामात अडथळा करुन पोकॉ शेख, पोसई जाधव, पोकॉ/ चव्हाण व पोहेकॉ उघाडे यांना धक्काबुक्की केली. जिव्हेश्वर चौक ते उत्तरेकडे असलेले जिजामाता उद्यानापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर हा गोंधळ बराच वेळ सुरू होता.

याप्रकरणी पोकों / १९०० अमीन यासीन शेख यांचे फिर्यादीनुसार अब्दुल शुकूर कुरेशी (वय ५० वर्षे, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर), सद्दाम शुकूर कुरेशी (वय ३० वर्षे, रा. कुरेशी गल्ली, सोलापूर), शहेनशहा शुकूर कुरेशी (वय २२ वर्षे, रा. २८७, बेगम पेठ, सोलापूर) आणि शोहेब शुकूर कुरेशी (वय २५ वर्षे, रा. २८७ बेगम पेठ, सोलापूर) यांच्याविरूद्ध भादंवि ३५३, ३३२, १८६, ११४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

असा घडला शासकीय कामात अडथळा ! 

 

जनावरांना अत्यंत निर्दयतेने, क्रूरतेने त्यांच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता, जनावरांची सुरक्षिततेची कसलीही काळजी न घेता बांधून ठेवल्याप्रकरणी चौघा कुरेशींविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

सद्दाम शुकूर कुरेशी, अब्दुला शुकूर कुरेशी (रा. तेलंगी पाच्छा पेठ), शोएब शुकूर कुरेशी आणि शहनशा शुकूर कुरेशी (रा. बेगम पेठ, सोलापूर) अशी आरोपितांची नावे आहेत. त्यांनी मोहमदिय्या मशिद समोरील कुरेशी गल्ली, माशाल्लाह बिफ मटन दुकानाजवळ शनिवारी सकाळी एक गाय व दोन वासरे निर्दयतेने बांधून ठेवल्याप्रकरणी पोकॉ/ १९०० अमिन यासिन शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय. पोलीस हवालदार खान या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel