सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

मराठा आरक्षणाकरिता कै.अण्णासाहेब पाटील यांचे मोठे योगदान – पोखरकर

मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याकरिता कै. अण्णासाहेब पाटील यांनी पहिला एल्गार पुकारला होता. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. अशी त्यांची भूमिका होती. मात्र मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार कुमकवत ठरल्यामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. स्वतःच्या जीवाचं बलिदान देणारे कै.अण्णासाहेब पाटील हे एकमेव मराठा आहेत .मराठा आरक्षणाकरता त्यांनी दिलेलं योगदान मराठ्यांना कधीही विसरता येणार नाही .असे मत मराठा समाजाचे विजय पोखरकर यांनी व्यक्त केले.
कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात स्वर्गीय.कै.अण्णासाहेब पाटील यांच्या ४३ व्या. पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात पोखरकर ही बोलत होते.
यावेळी कै. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पूरकर यांच्या हस्ते विजय पोखरकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले
यावेळी अविनाश मुळीक,सागर दळवी,नितीन मोरे, गणेश केत,मनोज भांगे, पृथ्वीराज गंभीरे, संतोष चव्हाण, सविता गांगणे ,अण्णासाहेब पाटील महामंडळाची जिल्हा समन्वयक योगेश वाघ, शिवलीला स्वामी, अंजली तानवडे आधी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवलीला स्वामी यांनी केले तर आभार योगेश वाघ यांनी मानले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel