Solapur court matterन्यायालय निर्णयसोलापूर बातमी

अल्पवयीन पिडितेवर लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म केल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर.

वरील प्रकरणात अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक ६५०/२०२३ अन्वये दिनांक २१/१२/२०२३ रोजी भा.द.वि. कलम ३७६(२)(n) तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) चे कलम ४,६ प्रमाणे आरोपी सोहेल मैनौदिन मकानदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणा पिडीतेला अशक्तपणा जाणवल्याने तिस जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे उपचाराकरिता नेले असता ती चार महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले होते. आरोपीच्या आई वडिलांनी पिडीतेच्या आई वडिलांसोबत लग्नासंदर्भात मागणी केली होती व तसेच आरोपीने पीडित घरी एकटी असताना तिला फूस लावून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून तिच्यावर दुष्कर्म केले होते .परंतु पिडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असूनही देखील तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने दुष्कर्म केले होते. पिडिता लग्नाच्या अमिषाला बळी पडून व पिडीतेच्या आई-वडिलास जवळीक साधून लग्न करण्याच्या आश्वासन दिल्याने आरोपीने सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. आरोपीचा जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. केंद्रे यांनी आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. सोहेल रामपुरे,ॲड. वैभव बोंगे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login