जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर

राज्य शाळा कृती समिती आणि बहुजन शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर दि. महाराष्ट्र
शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागाने आठ सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागवले होते. मागविलेल्या प्रस्तावनुसार जिल्ह्यातील तीनशे वीस शाळांनी मुदतीमध्ये प्रस्ताव सादर केले गेले. या 320 शाळाना अनुदानाचा पुढील टप्पा वाढ आदेश मिळण्यासाठी पुणे विभागाचे माजी शिक्षक आ दत्तात्रय सावंत, बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दि 24रोजी दिवसभर ठिय्या मारून पाठपुरावा केला. दिवसभराच्या पाठपुराव्यानंतर रात्री 9:00 वा माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी प्रतिनिधिक स्वरूपात दोन आदेश वितरित केले. यामध्ये साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अँट्रोळी ता दक्षिण सोलापूर आणि राजश्री राजनजी पाटील माध्यमिक विद्यालय पेनूर ता मोहोळ यांचा समावेश आहे. 100 आदेश दि 25 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तर उर्वरित आदेश दोन दिवसात वितरित करण्याचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप आणि उपशिक्षण अधिकारी विठ्ठल ढेपे यांनी सांगितले.
यावेळी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, जिल्हा सचिव विकास शिंदे,सरफराज बलोलखान, बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, उत्तर सोलापूर अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड, दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे,जिल्हा संघटक सिद्धेश्वर भुरले, शहर प्रमुख इंनूस बाळगी, निर्मला मौळे, इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यतत्परतेबद्दल जिल्ह्यातील शेकडो शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia