जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते…

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाने व्हिएतनाम व थायलंड या देशातून नाव, पदनाम व छायाचित्र वापरून बनावट सोशल मीडिया खाते तयार करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खात्यामार्फत काही व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. व जिल्हाधिकारी यांनी स्वतः सायबर सेल येथे या अनुषंगाने तक्रार दाखल केली असून पोलीस विभागाच्या सायबर सेल मार्फत गुन्ह्याची तपासणी सुरू झालेली आहे.

जिल्हाधारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याकडून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांकडून आर्थिक व्यवहार किंवा मागणी केली जात नाही. बनावट खाते व त्यावरील संदेशांमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांना बळी पडू नये, तसेच कोणत्याही संशयास्पद संदेशांची त्वरित माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सदर बनावट खात्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व छायाचित्र वापरून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर “Collector & District Magistrate” अशी नोंद करून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel