Solapur court matterन्यायालय निर्णयसोलापूर बातमी

लग्नाचे अमिष दाखवून अज्ञानावर अत्याचार करणा-या आरोपातून जामीन मंजूर.

सोलापूर :- मुर्गीनाला लष्कर येथे राहणारा सिद्राम ऊर्फ सिद्धू पडसलगी याने आपला मित्र प्रज्वल थिटे याच्यासह पिढीता व तीची बहिण यांना लग्नाचे अमिष दाखवून बोलावून घेऊन शरिर सबंध ठेवले तीच्या आईच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले म्हणून विजापूर नाका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याकामी आरोपी सिद्धू पडसलगी यास अटक करण्यात आलेली होती आरोपी सिद्धू पडसलगी याने अँड. अजमोद्दीन शेख यांच्या मार्फत जामीन मिळावा म्हणून सोलापूर येथील मे. सत्र न्यायाधीश सो यांच्या कोर्टात जामीन अर्ज दाखल केलेला होता.
त्याकामी आरोपीचे वकील अँड. अजमोद्दीन शेख यांनी पिढीता ही प्रेम संबधातून सोबत आलेली होती प्रेम सबंधातून घटना घडली आहे असा युक्तीवाद केला असता तो ग्राह्य धरून मे कोर्टानी सिद्ध पडसलगी याची रूपये २०.०००/- च्या सशर्त जामीनावर मुक्त केली.
याकामी अँड. अजमोद्दीन शेख, अँड. सैफोद्दीन शेख यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel