सोलापूर क्राईम

लाच प्रकरण ; महावितरण कर्मचाऱ्यास जामीन मंजूर

उस्मानाबाद ( प्रतिनीधी ):-  तुळजापूर पोलीस   स्टेशन* अंतर्गत गुन्हे क्रमांक _१६१/२०२४_ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ व १२ प्रमाणे यातील आरोपी लोकसेवक _नितीन किसन सितापे_ व इतर २ यांच्याविरुद्ध दिनांक _०७/०४/२०२४_ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात यातील फिर्यादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे साईट सुपरवायझर असून त्याच कंपनीच्या वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हंगरगा येथील तीन इलेक्ट्रिक पोल व गावातील लाईटची वायर दिनांक ०५/०४/२०२४ तुटले होते. त्यानंतर हंगरगा येथील वायरमेन आरोपी लोकसेवक सितापे यांनी फिर्यादीस कारवाई न करण्यासाठी व तसेच वरिष्ठांना न कळवण्याकरिता  १०००० रुपयांची लाचेची मागणी केली  होती. त्यानंतर लाचेची रक्कम ही हंगरगा येथील एका खाजगी इसम यांनी आपल्या फोन-पे द्वारे स्वीकारली होती. त्याअनुषंगाने दिनांक ०६/०४/२०२४ रोजी सापळा कारवाई करून उस्मानाबाद येथील एसीबी अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपी लोकसेवकांना व इतर दोघांना अटक केली होती. 

आरोपीने आपला जामीन अर्ज *जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद* येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री गुप्ता यांनी आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. यशवंत जाधव, ॲड. ओंकार पाटील, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel