सोलापूर बातमीशैक्षणिक

श्रीमती गोपाबाई दमाणी रक्तकेंद्राचे द्विशतकवीर रक्तदाते श्री अशोक नावरे यांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न :

इंडियन रेडकॉस सोसायटी, श्रीमती गोपावाई दमाणी रक्तकेंद्राचे प्रशासकिय अधिकारी श्री. अशोक नावरे यांचा दिनांक १.६.२०२४ रोजी दमाणी रक्तकेंद्राच्या तिसरया मजल्यावरील फंक्शन हॉलमधे प्रमुख पाहूणे श्री राजशेखर शिवदारे, इंडियन रेडकॉस सोसायटीचे मानद सचिव श्री जयेश पटेल व मानद सहसचिव श्री खुशाल देढिया यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. श्री अशोक नावरे यांनी यावेळी आपले २३४ वे व शेवटचे रक्तदान केले. लायन्स क्लव ऑफ सोलापूर कडुन द्विशतकवीर रक्तदाते श्री अशोक नावरे व दमाणी रक्तकेंद्राच्या शतकवीर रक्तदात्यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

या कार्यकमास व्यासपीठावर इंडियन रेडकॉस सोसायटीचे मानद खजिनदार श्री. विजय उपाध्ये, लायन्स क्लव ऑफ सोलापूर चे अध्यक्ष श्री. गिरीश देवरमनी व सचिव श्री. मंजुनाथ दर्गीपाटील उपस्थित होते.

कार्यक्रमास इंडियन रेडकॉस सोसायटीचे संचालक श्री. राज मिणीयार, श्री. संदिप जवेरी, श्री. राजीव देसाई, श्री गुरूलिंग कन्नुरकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. राजश्री जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. खुशाल देढिया यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel