श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालयाचे व्हा. चेअरमन पदी श्री रमेश श्रीहरी विडप यांची निवडः
सोलापूर : येथील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हा. चेअरमनपदी श्री रमेश श्रीहरी विडप यांची निवड करण्यात आले. यावेळी मा. श्री. उमेश पवार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली.
रुग्णालयाचे नूतन व्हा. चेअरमन यांनी निवडीबद्दल मा. प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली, मा. चेअरमन डॉ. विजयकुमार अस्काल व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.
रुग्णालयाचे चेअरमन डॉ. विजयकुमार अरकाल, माजी व्हा. चेअरमन श्री. श्रीनिवास कमटम यांनी व्हा. चेअरमनपदी निवडीबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदनपर भाषण केले तसेच मा. श्री. उमेश पवार – सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांचे आभार मानले.
याप्रसंगी रुग्णालयाचे सर्वश्री डॉ. माणिक गुर्रम, विनायक कॉड्याल, अशोक आडम, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमूल, इरेशम कोंपेल्ली, सुरेश फलमारी, सुधाकर गुंडेली, आनंद चंदनशिवे, श्रीधर बोल्ली, सौ. माधवी चिटयाल तसेच प्रशासकीय अधिकारी श्री स्वामी आकेन इ. उपस्थित होते.