सोलापूर क्राईम

सोलापुरातील निखील कांबळे यास केले एमपीडीए अन्वये स्थानवध्द

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा आणखी एका आरोपीस दणका

सोलापूर (प्रतिनीधी ):- सोलापूर शहरातील विजापूर नाका, सदर बझार, एमआयडीसी आणि सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे, वय ३३ वर्षे, रा. भिम नगर, सोरगांव, सोलापूर हा मागील काही वर्षांपासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन गैरकायद्याची मंडळी जमविणे, मारामारी करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, दुखापत करणे, घरफोडी, मोटार सायकल चोरी आणि धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण २० गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

नितीन ऊर्फ निखील मारुती कांबळे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२० मध्ये क. ११० (फ) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार व सन २०२१ मध्ये क. १०७ फौ.प्र. सं अधिनियमानुसार व सन २०२२ मध्ये क.३ एमपीडीए अधिनियम अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.०३/०४/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करून, त्यास दि.०३/०४/२०२४ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही, मा. एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा.डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजय परमार, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०२, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, दादा गायकवाड, वपोनि, विजापुर नाका पोलीस ठाणे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel