महाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चात काँग्रेस – भाजपचे उमेदवार झाले सहभागी

सोलापूर मध्ये कर्नाटकातील नेहा हिरेमठ हात्यप्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे चार हुतात्मा चौकात सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते हे दोन्ही लोकसभेचे उमेदवार सहभागी झाले होते.यापूर्वी लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदे हे दोन्ही रामनवमीच्या मिरवणुकीत एकमेकांच्या समोर आले होते त्यावेळी एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि दुसरीकडे जय श्रीराम अशा घोषणांनी सारा परिसर दोन दणाणून गेला होता. कर्नाटकातील नेहा हिरेमठ आणि मानखुर्द मधील पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात हा मोर्चा काढण्यात आला होता. महिलांची प्रचंड मोठी उपस्थिती या मोर्चात होती. या घटनेतील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच लव जिहाद वर सरकारने बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel