सोलापुरात घरगुती गॅसचा काळाबाजार; हरिदास शंकर गायकवाड स्थानबद्ध..!

प्रथमच, अत्यावश्यक वस्तू (एल.पी.जी.) चा काळा बाजार करणारी व्यक्ती म्हणून, हरीदास शंकर गायकवाड हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द. सोलापूर शहरातील सलगर वस्ती, पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी नामे हरीदास शंकर गायकवाड, वय ५२ वर्षे, रा. १६०, मंजुनाथ नगर, लिमयेवाडी, सलगर वस्ती, सोलापूर हा सन २०२३ पासून स्वतः अवैध आर्थिक फायदा मिळविण्याकरीता, अवैधरित्या अत्यावश्यक वस्तुं म्हणजेच घरगुती वापराचा एलपीजी गॅस हा इंधन म्हणून अॅटोरिक्षामध्ये भरून गुन्हे करीत होता. त्याचेअनुषंगाने, त्याचे या अवैध व्यवसायावर सलगरवस्ती पोलीस ठाणे, सोलापूर शहर तसेच गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांचेकडून वेळोवळी कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. त्याचे या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी, सन २०२४ मध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १२९ अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही, हरिदास शंकर गायकवाड याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. स्थानबध्द हरीदास गायकवाड याने घरगुती वापराचा एलपीजी हा अत्यावश्यक वस्तूमध्ये समाविष्ठ होत असताना, त्याचा घरगुती वापराचा एलपीजी इंधन म्हणून अॅटोरिक्षामध्ये भरण्याकरीता, काळाबाजार करून, त्याचे आर्थिक फायदयाकरीता, कोणतीही सुरक्षा न बाळगता, अवैधरित्या घरगुती वापरचा एलपीजी हा इंधन म्हणून अॅटोरिक्षामध्ये भरण्याचे उद्देशाने मिळून आल्याने माहे फेब्रुवारी व मार्च २०२५ या कालावधीमध्ये गुन्हे शाखा, सोलापूर शहर व सलगरवस्ती पोलीस ठाणे यांनी स्थानबध्द इसमांचे विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८६, २८७ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये ०२ गुन्हे दाखल केले. स्थानबध्द इसमाचे अश्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील, अत्यावश्यक वस्तूचा (घरगुती वापराचा एलपीजी) पुरवठा बाधित झाला असून, तो सार्वजिनक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. तसेच सदर अवैध व्यावसाय सुरळीतपणे चालू ठेवण्याकरीता सामान्य नागरीकांमध्ये स्वतःची दहशत निमार्ण केलेली आहे. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे, त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांना, स्थानबध्द इसम हा अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाल्याने, दि.१४/०४/२०२५ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास दि. १४/०४/२०२५ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. सोलापूर शहर आयुक्तालयतील अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्ती या सदरखाली सोलापूर शहरतील हि पहिलीच कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही, मा. एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), श्री. विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), श्री. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. यशवंत गवारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, विभाग-०२, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री. उमाकांत शिंदे, वपोनि, सलगर वस्ती, पोलीस ठाणे, सपोनि/तुकाराम घाडगे, गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.