सोलापूर क्राईम
सोलापूरचे माजी नगरसेवक सुभाष (मामा)डांगे यांना पुत्रशोक ; बंटीचा नदीत बुडून मृत्यू
सोलापूर महानगरपालिकेचे माजी सदस्य , माजी नगरसेवक सुभाष उर्फ मामा डांगे यांचे थोरले चिरंजीव यशवंत उर्फ बंटी सुभाष डांगे ,वय वर्ष 42 यांचा उज्जैन येथील धामनोद येथे नर्मदा नदीत पोहायला गेले असताना आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला.आज सोमवारी रात्री सोलापुरात त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आणला जाणार आहे.
यशवंत हे छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी कंपनीत उच्च अधिकार पदावर कार्यरत होते.होळीच्या सुट्टीमध्ये महाकालेश्वर यांच्या दर्शनासाठी ते आणि त्यांचे तीन मित्र गेले होते.उज्जैन येथील महाकालेश्वर भस्म आरती मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्यासोबत इतर तीन मित्र गेले होते. नर्मदा नदीत अंघोळ करताना खलघाट येथील भागात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मासेमारी करणाऱ्या काही जणांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून धामनोद येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.