सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी ला इंडोनेशियात सुवर्ण पदक
जकार्ता इंडोनेशिया येथे दि. १६ ते १८ मे २०२४ दरम्यान सुरू असलेल्या परी शक्ती डाइविंग इंटरनॅशनल कॉम्पिटेशन २०२४ मध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना डायव्हिंग हायबोर्ड या क्रीडा प्रकारात १८३.२० गुणासह गोल्ड मेडल पटकावले आहे.
या स्पर्धेत भारतासह मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर व सौदी अरेबिया या देशातील एकूण १४६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला आहे.
श्रावणीने आजवर डायव्हिंग प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशनच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत राज्य पातळीवर १६ गोल्ड आणि २ सिल्वर आणि १ ब्रांज पदक मिळवले आहे तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने ७ गोल्ड, ४ सिल्वर आणि २ ब्रांज पदके मिळविली आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने १ गोल्ड, १ सिल्वर आणि १ ब्रांज पदक मिळवले आहे.
यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या योगदानासाठी फिना रेफरी श्री. मयुर व्यास सर व जज्ज श्री.हिमांशू तिवारी सर यांनी श्रावणीचे भरपूर कौतुकासह अभिनंदन केले आहे.