खेळ

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी ने महाराष्ट्र साठी पटकवले पहिले गोल्ड मेडल

दि. १३ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान अहमदाबाद येथील वीर सावस्कर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या ७८ व्या सिनियर नेशनल अक्वेटिक चॅम्पियनशिप २०२५ या राष्ट्रीय स्पर्धेत, पहिल्या दिवशी सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कराताना डायविंग या क्रीडा प्रकारात ३ मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये १८६.५० गुणासह पहिल्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.

श्रावणी ही देगांव येथील स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव, सोलापूरची विद्यार्थिनी असून ती इयत्ता १२ वी शास्त्र शाखेत शिकत आहे.

या राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात इत्यादी राज्यातील व एसएसईबी, रेल्वे च्या मुलीनी सहभाग नोंदविला.

राज्य पातळीवर २२ गोल्ड, ६ सिल्वर, १ बाँझ‍
राष्ट्रीय पातळीवर १६ गोल्ड, ५ सिल्वर, २ बाँझ,
आतंरराष्ट्रीय २ गोल्ड, ४ सिल्वर, २ बाँझ

याप्रमाणे तिने एकूण ६० पदके वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे, कुंजकिशोर मेलेम, अतुल पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर, विश्वस्त विठ्ठल वानकर, प्राचार्य खांडेकर आर वी क्रीडाशिक्षक श्री बेलुरे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी श्रावणीचे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel