सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या सभासदांना भेटवस्तू आणि दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

मजूर सहकारी संस्थांचे कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार:- उपनिबंधक किरण गायकवाड

सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीनं नववर्षानिमित्त सभासदांना सतरंजी भेटवस्तू आणि सन 2025 चे दिनदर्शिका प्रकाशन लेबर फेडरेशनच्या कार्यालयाच्या सभागृहात सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक गावडे, सहकारी अधिकारी अर्जुन तांबट, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, व्हाईस चेअरमन मुजीब शेख, कामवाटप समिती सदस्य श्याम पवार संचालक चंद्रकांत अवताडे, राजू सुपाते अरुण घोडके अरुण थेटे संजय साळुंखे यशवंत शिंदे नागेश साठे, शिवाजी चव्हाण राज्य फेडरेशन प्रतिनिधी अभिराज शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभिक ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन मुजीब शेख यांनी प्रास्ताविकात मजूर संस्थांच्या अडीअडचणी बाबत आपल्या समस्या मांडल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चेअरमन शंकर चौगुले यांनी केले. 25 वर्षानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या सभासदांना भेट वस्तू स्वरूपात पूर्ण फुलाची पाकळी म्हणून संस्थेच्या वतीने देण्यात येत आहे मजूर संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी या संदर्भात सहकारी संस्थांचे नियंत्रण महाराष्ट्र राज्यात राज्य सरकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे येत असते यामुळे अडचणीत सापडलेला मजूर संस्थांना काम वाटपासह इतर अडचणी दूर व्हाव्यात येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून काम वाटपा संदर्भात आपण महत्त्वाची भूमिका बजावावी अशी आशा यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर चौगुले यांनी उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या समोर व्यक्त केले. लेबर फेडरेशनच्या सभासदांना आणि मजूर संस्थांना कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेऊ संस्थेच्या काम वाटपा संदर्भात आपण हस्तक्षेप करून मजूर संस्थांना काम कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी यावेळी उपस्थित सभासदांना दिले सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद असून या पुढील काळात आपले सहकार्याची भूमिका असणार असल्याचेही यावेळी उपनिबंधक गायकवाड म्हणाले. यावेळी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel