सोलापूर मनपाच्या निष्क्रियते विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे जनजागृती फलक लावून आंदोलन निष्पाप बळी गेलेल्या मंगला कांबळे कुटुंबीयांना 25 लाख रुपये
सोलापूर दिनांक 16/7/2024 सुंदर सोलापूर शहर म.न.पा च्या निष्क्रिय व भ्रष्टाचारी कारभारामुळे झाले बंदर सोलापूर झाले म्हणून निष्क्रिय म.न.पा आयुक्त व अधिकारी यांच्या निष्क्रियतेमुळे सोलापूरचे झालेली दुरावस्था जनतेसमोर आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सह संपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे,महानगर प्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज)यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर जनजागृती फलक लावून आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी शिवसेना जिंदाबाद,शिवसेनेचा विजय असो, उद्धवसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,या घोषणा बरोबरच निष्क्रिय महापालिकेचा अधिकार असो, भ्रष्टाचारी महापालिका अधिकाऱ्यांचा अधिकार असो, सुंदर सोलापूरचे बंदर सोलापूर करणाऱ्या आयुक्त व अधिकारांचा धिक्कार असो,निष्पाप जनतेच्या बळी घेणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो,निष्क्रिय व खोके सरकारचा अधिकार असो अशा घोषणा दिल्या
यावेळी माध्यमांशी बोलताना उत्तम प्रकाश खंदारे यांनी दुहेरी जलवाहिनीत झालेल्या भ्रष्टाचाराचा समाचार घेतला.
महानगर प्रमुख विष्णु कारामपुरी (महाराज)यांनी सोलापुरात महापालिका अधिकारी व कार्यालय म्हणजे यमदूत व यम सदन झाले आहे. सोलापुरात सर्वत्र अस्वच्छ, दुर्गंधी, चेंबर, गटारी तुंबून जाणे, मोकाट जनावरे, इतर अनेक कारणांमुळे सोलापुरात रोगराई पसरत आहे म्हणून जनतेने आता रस्त्यावर उतरण्या वेळ आली आहे म्हणून सदर जनजागृती फलक आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले तर शहर प्रमुख महेश धाराशिवकर म्हणाले की आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास महापालिकेत घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारू असे म्हणाले
जिल्हा परिषद पूनमगेट येथे झालेल्या आंदोलनात विष्णू कारमपुरी(महाराज),उत्तमप्रकाश खंदारे,महेश धाराशिवकर,अमित भोसले,संतोष पाटील,राजू बिराजदार,लहू गायकवाड, संताजी भोळे,बाळू गायकवाड, अण्णा गवळी,रेखा आडकी, सोमनाथ शिंदे,संदीप बेळमकर, शिवा ढोकळे,दीपक दुधाळे प्रशांत जक्का ,गणेश म्हंता, गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभाराविरोधात जनजागृती फलक लावून आंदोलन करण्यात आले सदर प्रसंगी उत्तम प्रकाश खंदारे विष्णु कारामपुरी(महाराज), संतोष पाटील,महेश धाराशिवकर,अमित भोसले रेखा खडकी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.