सोलापूर महापालिकेच्या सत्तेची चावी पुन्हा कोठे घराण्याकडे ; तिसरी पिढी करणार राज्य

सोलापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश मिळवले. काँग्रेसचा सुपडा साफ केला. या निवडणुकीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्यावरील पक्षाचा विश्वास आणखीच वाढला आहे.
सोलापूरचे कोठे घराणे कायमच महापालिकेत किंगमेकर राहिले आहे. आता तिसरी पिढी महापालिकेवर राज्य करीत आहे. स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्याकडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महापालिकेच्या सत्तेचे सर्व अधिकार दिले होते. त्यानंतर दिवंगत नेते माजी महापौर महेश कोठे त्यांनी अनेक वर्ष महापालिकेच्या सत्ता सांभाळली. आता देवेंद्र कोठे आणि प्रथमेश कोठे ही तिसरी पिढी महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली असल्याचे दिसून येते.
महापालिका निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांनी प्रथमेश कोठे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन अनेक राजकीय समीकरणे जुळवून आणली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा झाला. दहा ते बारा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे वाढले. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची खंबीर साथ देवेंद्र कोठे यांना लाभली आहे.
यंदा सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पदे सर्वसाधारण साठी आरक्षित झाले. त्यामुळे अनेकांच्या नावाची चर्चा झाली सर्वसाधारण प्रवर्ग असल्याने मराठा समाजाला संधी मिळणार का? अशी चर्चा होती. मराठा समाजातून अनंत जाधव यांचे नाव चर्चेत राहिले. दुसरीकडे पक्षाशी एकनिष्ठ असलेले नरेंद्र काळे यांच्या नावाचाही जोर वाढला होता. पण आयत कोलीत दुसऱ्याच्या हातात कसे देणार.
अडीच वर्षे महापालिकेच्या सत्तेची चावी आपल्या ताब्यात राहण्यासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले विनायक कोंडयाल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार आहे. विनायक कोंडयाल आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. त्यामुळे महापालिकेची सर्व सूत्र हे निश्चितच देवेंद्र कोठे यांच्या ताब्यात असणार हे पण तितकेच खरे आहे….



