राजकीय

राहुल गांधी यांनी हातात भगवा घ्यावा. मग आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार -गुलाबराव पाटील

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हातात भगवा घ्यावा. मग आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत. असे वक्तव्य शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे. हिंदुत्वाकरता केलेली आहे. राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकतो हे कधीच होणार नाही, मात्र काँग्रेससोबत युती करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगत राहुल गांधींसमोर एक अट ठेवली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत.

गाडी फेल होईल, जाऊ नका…

गुलाबराव पाटील म्हणाले, यापूर्वीच आम्ही उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी होण्याआधी सावध केले होते की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia