सोलापूर मुजावर जमात जिल्हाध्यक्षपदी सादिक मुजावर यांची निवड…

महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री. नजीरअहमद एम. मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. सिकंदर तय्यबअली मुजावर (उपाध्यक्ष) व श्री. मंहमद महिबूब मुजावर (सचिव) यांच्या उपस्थितेखाली मुजावर, खादीम, खुद्दाम, मुश्रीफ, शरिके मसलत, कादरी या सर्व जमातीचे बैठक आज दिनांक ०२.०२.२०२५ रोजी सकाळी ठिक ११.३० वाजता शाहजहूर दर्गा येथे बैठक पार पाडून त्यावेळेस जिल्हा व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष श्री. सादिक इस्माईल मुजावर व सचिव श्री. लाडलेमशाक अब्दुलगनी मुजावर व उपाध्यक्ष शब्बीर मासुमसाब मुजावर तसेच कार्याध्यक्ष श्री. मझहर बशीरअहमद मुजावर.
तसेच शहर कार्यकारणीचे अध्यक्ष श्री. हुशेनबाशा अब्दुलगनी मुजावर व सचिव श्री. जावेद बाशुमियाँ मुजावर व उपाध्यक्ष नवीन इनायतअली कादरी व तसेच कार्याध्यक्ष सलिम महामुद मुजावर यांच्या राज्य कार्यकरणीच्या संमतीने व सर्वांनुमतीने ठराव मंजूर करुन एकमताने निवड करण्यात आली….