सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

क्रांतिसूर्य म. फुले आणि प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन…

क्रांतिसूर्य म. फुले आणि प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सम्यक प्रज्ञा शोध परीक्षेचे रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता आयोजन केले असल्याची माहिती राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी दिली आहे. परीक्षेचे हे ५ वे वर्ष असून एकूण रुपये १५,०००/-ची शिष्यवृत्ती विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे. ही परीक्षा जगताप क्लासेस, मॉडर्न शाळेसमोर,गांधी नगर सोलापूर येथे संपन्न होणार आहे. परीक्षा लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येणार आहे.परीक्षेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयाची कोणतीही अट नाही.
परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करायची असून परीक्षा फी आणि अधिक माहिती साठी बुद्धजय भालशंकर ( मो. ९९६०३७२७३६) आणि आशुतोष तोंडसे ( मो. ७०३८८८३३३९) यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel