सोलापूर लोकसभा निवडणुकीत MIM देणार उमेदवार , प्रणिती शिंदे यांची डोके दुखी वाढणार
सोलापूर (प्रतिनिधि) :- सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात उमेदवारीवरून गेलेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू असताना , या ठिकाणी भाजपला लवकर उमेदवार मिळत नव्हता, आता भाजपने आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली आता मात्र आणखी एक नवा ट्रिस्ट समोर आला आहे. मजली ए इत्तेहादून मुस्लिमिन अर्थात AIMIM पक्षाने सोलापूर मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी तिघांनी तयारी दर्शवली असून त्यांची नावे हैदराबाद येथे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष फारूश शाब्दी यांनी दिली आहे.MIM पक्षाच्या उमेदवारी मुळे पुन्हा आमदार प्रणित शिंदे यांनी डोकेदुखी वाढणार आहे. कारण याच MIM पक्षाने सन 2014 आणि 2019 मध्ये प्रणिती शिंदे यांना कडवे आवाहन देऊन दोन्हीही निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. आता तेच MIM पुन्हा लोकसभेला प्रणिती शिंदे यांना कडवे आवाहन देणार का अशी चर्चा सोलापूर लोकसभा मतदार संघात रंगली आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघातून मुस्लिम, एससी, धनगर समाजाची मते एमआयएमकडे वळू शकतात. याचा काही अंशी थेट फटका महायुतीसह महाआघाडीच्या उमेदवारास वसू शकतो. तरीही मुस्लिमसह अन्य जातींची मते विभागली गेली तर त्याचा फायदा भाजपला होतो हा इतिहास आहे. पण काँग्रेस आणि भाजप अशी दुरंगी सामना होणार असा अंदाज दिसत असताना आता यात MIM ने उडी मारल्याने अनेकांच्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे….