सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजेचा शॉक लागून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

विनोद गंगाराम फत्तेवाले वय वर्ष 30 राहणार लष्कर सोलापूर असे मयत फरशी काम करणाऱ्या मजुराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास बलदवा हॉस्पिटल जवळील वसंत विहार येथे विनोद गंगाराम फत्तेवाले हे तिसऱ्या मजल्यावर फरशीचे काम करत होते. त्यावेळेस ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळत नातेवाईक हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांना बेशुद्ध अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मिळत झाल्याची सांगितले.
विनोद गंगाराम फत्तेवाले यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून याबाबत नातेवाईकांनी ठेकेदार व बिल्डरवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मांडली.
याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली.



