सोलापूर बातमी

सोलापूर शहरात अतिवृष्टीनंतर जमियत उल्मा ए हिंद मदतीला धावली; आरोग्य शिबिर व आर्थिक सहाय्याने पूरग्रस्तांना दिलासा

सोलापूर शहरात १० सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अवघ्या काही तासांतच शहरातील जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी आदी परिसरात चार फूटांपर्यंत पाणी साचले. अनेक घरांत पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे वीजेपासून ते अन्नधान्यापर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिक भयभीत झाले होते.

या संकटकाळात जमियत उल्मा ए हिंद ही सामाजिक संस्था तातडीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली. संस्थेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी बस्वेश्वर नगर आणि मक्का मस्जिद परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे नेतृत्व जमियत उल्मा ए हिंदचे जनरल सेक्रेटरी यांनी केले. शिबिरात डॉ. अब्दुल शेख (अध्यक्ष), डॉ. आफरीन हिमोने (जमादार), अझहर शेख तसेच जमियत हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व परिचारिका कर्मचारी सहभागी झाले. परिसरातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक औषधे विनामूल्य वितरित करण्यात आली. यामुळे अनेकांना आजारपणावर त्वरित उपचार मिळाले.

पूरग्रस्त कुटुंबांना केवळ आरोग्य सेवेचीच नव्हे तर आर्थिक मदतीचीही गरज असल्याचे लक्षात घेऊन जमियत उल्मा ए हिंदच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात सहाय्याचे वाटप करण्यात आले. १२ सप्टेंबर रोजी उत्तर जमियत उल्मा ए हिंदच्या वतीने सुमारे १२० कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख आर्थिक मदत देण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा जमियत उल्मा ए हिंदचे सेक्रेटरी हाफिज महमूद साब, मौलाना अबू सलाम, मौलाना कासीम राशिद, मौलाना कमर साब, मौलाना अल्ताफ साब, मुफ्ती मोहम्मद साब तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूरग्रस्तांना आरोग्य सेवा आणि आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. स्थानिक नागरिकांनी जमियत उल्मा ए हिंदचे आभार मानत संस्थेच्या या मदतकार्याचे कौतुक केले.

जमियत उल्मा ए हिंदच्या या पुढाकारामुळे शहरातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून, संकटाच्या काळात सामाजिक संस्थांचे योगदान किती महत्वाचे असते याचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel