सोलापूर राजकीयजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरसोलापूर महानगरपालिका

खासदार प्रणिती शिंदे यांची मुसळधार पावसात नुकसानग्रस्त भागांना भेट

सोलापूर :
सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून घरामध्ये पाणी शिरल्याने सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरगुती वस्तूंचे नुकसान झाले, काहींच्या घरांच्या भिंती व छप्परही कोसळले. अचानक आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने शहरातील विविध भागांना भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या सोबत शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक, तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहणीदरम्यान नागरिकांनी खासदार शिंदे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. “घरात पाणी शिरल्याने फर्निचर, कपडे, धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना यात त्रास सहन करावा लागत आहे,” अशी व्यथा नागरिकांनी सांगितली. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. त्यांनी नागरिकांना दिलासा देत सांगितले की, “या आपत्तीच्या काळात काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. तातडीने महापालिका व प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती मदत मिळवून दिली जाईल. नुकसानग्रस्त कुटुंबांना सरकारी योजनांतर्गत तातडीची मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन.”

यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, नालेसफाईचे काम वेळेत करावे आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली.

सोलापुरात दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, यावर्षी झालेल्या नुकसानीबाबत शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशीही मागणी होत आहे….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login