महाराष्ट्र

हिंदुस्थानशी घेतलेला पंगा मालदीवला पडला भारी, दररोज होतेय कोट्यावधींचे नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी करणे मालदीवला चांगलेच महागात पडले आहे. हिंदुस्थानियांनी मालदीववर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवला दररोज कोट्यावधींचे नुकसान होत आहे.

या गोष्टीची माहिती खुद्द मालदीवकडून देण्यात आली आहे. हिंदुस्थानीयांनी बहिष्कार टाकल्यानंतर त्यांच्या देशातील 44 हजार कुटुंबियांवर त्याचा फरक पडला आहे. मालदीवचा महसूल पर्यटक आणि पर्यटनावर सर्वाधिक अवलंबून आहे. अशा स्थितीत हिंदुस्थानिय़ांना मालदीवमध्ये जाणे बंद केल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी मालदीवने तिथला खर्चही निम्मा केला आहे. मात्र तरीदेखील हिंदुस्थानीयांनी तिथे पाठ केली आहे. मालदीव सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला आहे. हिंदुस्थानच्या बहिष्कारामुळे मालदीवचे दररोज कोट्यावधीं रुपयांचे नुकसान होत आहे.. मागच्या वर्षी 2023 मध्ये मोठ्या संख्येने हिंदुस्थानी मालदीवला गेल्याने 38 करोड . गेल्या वर्षी एकट्या मालदीवमध्ये भारतीयांनी 38 कोटी डॉलर (सुमारे 3,152 कोटी रुपये) खर्च केले होते. अशा परिस्थितीत हिंदुस्थानियांनी तिथे जाणे बंद केले तर मालदीवचे दररोज किमान 8.6 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

मालदीव आता कंगाल होण्याच्या मार्गावर आहे. या वादाआधी मालदीव हे हिंदुस्थानीयांसाठी आवडते पर्यटन स्थळ होते. मालदीवला दरवर्षी लाखो हिंदुस्थानी फिरायला जातात. मात्र हिंदुस्थानने मालदीववर टाकलेल्या बहिष्काराने 44 हजार कुटुंबे संकटात सापडली आहेत. हिंदुस्थानियांच्या नाराजीमुळे त्यांच्या पर्यटन उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel