खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल…
खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करतानाच राज्यातील शिवसेना भाजपा युतीचे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांचा कुठल्याही सरकारी यंत्रणेने त्यांचे आदेश ऐकू नये, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात खासदार राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे खासदार राऊत यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाबुराव मंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या विरोधातही टीकेची झोड उठवत हे करून तिच्याविषयी काही अक्षय कार्य वक्तव्य केले होते.
नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दखल
राज्यातील सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे आहे त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांनी त्यांचे आदेश पाळू नका असे केले होते विधान नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत हा गुन्हा दाखल केला असून यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र आहेत पोलिसांनी केलेले कारवाई वर खासदार राऊत ठाकरे गटाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे बघणे आवश्यक ठरणार आहे तसेच पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट अनेक पातळीवर आमने-सामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राऊतांचे वक्तव्य काय?
खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने भाष्य केले. त्यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करु नये, असा आवाहन केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.