महाराष्ट्र

नेरुळ – उरण मार्गावर रुळावरून घसरले तीन डबे, वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

नवी मुंबईत लोकल ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. नेरुळ ते उरण जाणारी लोकल रेल्वेचे तीन डबे आज सकाळी अचानक रुळावरून घसरले. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. लोकलचे तीन डब्बे रुळावरुन घसरल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रुळावरुन घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम करण्यात आले आहे.

वाहतूक विस्कळीत

आज सकाळी 8.46 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोकलचे तब्बल तीन डब्बे अचानक घसरल्यामुळे बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे नेहमीच्या वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. काही लोकल गाड्या उशीरा येण्याची शक्यता आहे. ‘रेल्वे दल मदतीसाठी घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

प्रवाशांना दुखापत नाही

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी लोकल ट्रेनच्या अपघाताबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. बेलापूर ते खारकोपर लोकल रेल्वेचे तीन डबे खारकोप स्थानकाजवळ रुळावरुन घसरले. हा अपघात सकाळी 8.46 वाजण्याच्या सुमारास झाला. प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही, असे त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel