महाराष्ट्र

अजितदादा मुख्यमंत्री होणार? भाजपचा प्लान बी तयार

शिंदे गट शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आता खूप मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास भारतीय जनता पार्टीने सरकार वाचवण्यासाठी प्लान बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाल्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साधारण वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून ऐतिहासिक बंड केले. या बंडानंतर ठाकरे गटाने यातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले. दरम्यान, नार्वेकर यांनी लवकरात लवकर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने बजावले होते. मात्र, नार्वेकर यांच्याकडून निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याने ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सोमवार १८ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने नार्वेकर यांच्यावर कडक ताशेरे ओढले. आगामी एका आठवड्याच्या आत नार्वेकर यांनी शिंदे गट १६ आमदार अपात्र प्रकरणात निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानंतर नार्वेकर यांनी आमदार अपात्रता कारवाईला लगेच वेग दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यामुळे नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. शिंदे अपात्र ठरल्यास अजितदादा हे मुख्यमंत्री म्हणून भाजपचा पहिला पर्याय असतील. याशिवाय भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील नाव चर्चेत आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भारतीय जनता पार्टीकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजितदादा गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण येणार नाही.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login