सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

जिल्हयातील बालविवाह रोखण्यासाठी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ ची यंत्रणा सतर्क…

नागरिकांनी बालविवाह होत असल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन...

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईन १०९८ शासकीय यंत्रणा अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी सतर्क आहे. तरी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कुठेही आजूबाजूला बालविवाह होत असतील तर त्याची माहिती उपरोक्त हेल्पलाइन क्रमांकावर तात्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर यांनी केले आहे.
भारतीय संस्कृतीत विवाह हो. समाजातील महत्वाची आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केल्या जातात. अक्षय तृतीय हा महत्वाचा मुहूर्त असल्याने या शुभ मुहूर्तावर सामुदायीक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह होऊ देऊ नयेत. कारण बालविवाह ही प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असुन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार असे विवाह बेकायदा ठरतात आणि याविरोधात गुन्हा नोंदविला जातो.

चाईल्ड हेल्प लाईन १०९८ हे ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे अशा बालकांना सेवा पुरविते, यात रस्त्यावरील बालके, बालकामगार, शोषित बालके, देह विक्रीस बळी पडलेली बालके, व्यसनाधीन बालके, संघर्षग्रस्त बालके, मतिमंद बालके, एच.आय.व्ही. एड्स ग्रस्त बालके, आपत्तीग्रस्त बालके, कौटुंबिक कलहास बळी पडलेली बालके, वैद्यकिय मदतीसाठी, निवान्याच्या शोधात असलेले, हरवलेले बालके परत पाठवणेसाठी, शोषणापासून संरक्षण, भावनिक मदत व मार्गदर्शन, माहिती व संदर्भ सेवेकरिताचाईल्ड हेल्प लाईन १०९८ हि २४ तास मोफत सहाय्य करणारी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाची राष्ट्रीय दुरध्वनी सेवा आहे. आणि माहिती देणान्याचे नाव गोपणीय ठेवण्यात येते.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार विवाहातील मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असले पाहिजे जर वय त्यापेक्षा कमी असले तर ते बालविवाह मानले जाते. जर कोठे आपल्या आजू बाजूस बालविवाह होत असल्यास स्थानिक पोलीस स्टेशनला, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा चाईल्ड हेल्प लाईन च्या टोल फ्री नंबर १०९८ बर कळवावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login